latur guardian minister amit deshmukh instructed administration to get ready for next stage 
latur guardian minister amit deshmukh instructed administration to get ready for next stage  
मुख्य बातम्या मोबाईल

मनुष्यबळ तयार ठेवा : अमित देशमुख 

हरी तुगावकर

लातूरः कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढून आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास अनेक अडचणी येणार आहेत, हे लक्षात घेवून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आतापासूनच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवावे. या करीता खासगी क्षेत्राची मदत घ्यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोना संदर्भात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात लागणार आहे. हे लक्षात घेता मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरू करावे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.

खासगी क्षेत्रात कार्यरत असणारे वैद्यकीय व्यावसायिक, आयुष डॉक्टर, खासगी क्षेत्रातील लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएस, आणि नेहरू युवक केंद्रामधील स्वयंसेवक, निवृत्त वैद्यकीय व्यवसायीक, लष्करातील निवृत्त डॉक्टर, माजी सैनिक, रेडक्रॉस, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन यांची मदत घेण्याची तयारही ठेवावी. तसेच यातील प्रत्येक प्रवर्गासाठी प्रशिक्षण तातडीने सुरू करण्यात यावे अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT